-
सोनार सिद्धाच्या नावानी चांगभलं ! -
श्री कालभैरव जोगेश्वरी प्रसन्न
-
श्री कालभैरवाच्या नावानी चांगभलं !
-
-
-
प्रतिमा गॅलरी
कालभैरव महात्म्य (अख्यायिका)
महाराष्ट्राच्या पावन भुमित मराठमोळ्या धार्मिकदृष्ट्या महत्वाची जी पुरातन श्रध्दास्थाने आहेत, त्यातील महत्वाचे तीर्थ क्षेत्र म्हणजे सोनारी येथील सिद्धनाथ म्हणजेच श्री काळभैरवनाथ होय. ओंकाररुप असलेल्या श्री क्षेत्र सोनारी येथील श्री काळभैरवनाथाचे महात्म्य अनादिकालापासुनचे आहे. भैरवनाथाचा जन्म भगवान श्री शंकराच्या तृतीय नेत्रातून झाला अशी अख्यायिका आहे. नाशिक त्र्यबकेश्वरापासुन ते सुवर्णपुरी (सोनारी)पर्यंत हा भाग पुर्वी दंडकारण्याचा भाग होता श्रमहरीणी नदीच्या तिरावर महान तपस्वी ऋषि-मुनींच्या गुंफा होत्या ते सर्वध्यान-धारणाजप-तप करीत असत,परंतु याच दंडकारण्यात दैत्यांचे वास्तव्य होते. त्यांनी ब्रम्हदेवाची तपश्वर्या करुन अविवाहिताच्या हातुन मृत्यु नसावा असा वर घेतला. या वराचे आधारे ते मदोन्मत झाले ऋषि मुनींना त्रास देऊ लागले, धार्मिक कार्यात अडथळे करू लागले. त्यामुळे ऋषि मुनींनी ब्रम्हदेवाकडे गाऱ्हाणे केले की, आमच्या कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या दैत्याचा बंदोबस्त करा. ब्रम्हदेवाने त्यांना श्री शंकराची आराधना करायला सांगितली ऋषि-मुनींनी तिची घोर तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले त्यांनी सांगितले ठराविक काळानंतर माझ्या त्रीनेत्रातुन काळभैरवनाथाचा अवतार निर्माण होईल व तो दैत्यांचा संहार करेल. कार्तिक वद्य जन्माष्टमीस रात्री १२वा. काळभैरवनाथाचा जन्म शंकाराच्या तृतीयनेत्रातुन झाला.
शंकराच्या आज्ञेप्रमाणे भैरवनाथ सुवर्णपूरी (सोनारी) कडे दैत्यांचा संहार करण्यासाठी निघाले, परंतु ब्रम्हदेवाचे दैत्यांना अविवाहीताच्या हातुन मृत्यु येऊ नये व एकरक्ताच्या थेंबापासुन अनेक राक्षस निर्माण होतील असा वर होता त्यामुळे भैरवनाथाना लग्न करणे आवश्यक होते. ठराविक घटकेतच लग्न केले तरच मी थांबेन या अटीवर श्री भैरवनाथाचा विवाह अंबाजोगाई येथे जागेश्वरी या देवीशी ठरला. परंतु अटी प्रमाणे विवाह न झाल्याने ते पुढे निघुन गेले आजही अंबाजोबाई येथे अर्धवट विवाह सोहळा मुर्तिरुपात पहावयास मिळतो. भैरवनाथ सोनारीला आलेत्या वेळी जोगेश्वरी ने सोनारीपासुन ३ कि.मी. अंतरावर असणाया मुख्य ग्राम येथे शेषाच्या पोटी योगिनी हा अवतार धारण केला व चैत्र वद्य अष्टमीस रात्री १२ वा. भैरवनाथाचा जोगेश्वरीशी विवाह झाला. लग्नानंतर भैरवनाथानी दैत्यांशी युध्द करण्यास सुरूवात केली दैत्यावर वार करताच त्यांच्या रक्ताच्या थेंबापासून अनेक राक्षस निर्माण होऊ लागले. त्यावेळी भैरवनाथानी शंकिनी ,कंकीणी ,इकोनी, रंडा, मुंडाअशा चौसष्ठ योगिनींची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले. भैरवनाथाने राक्षसांवर वार करावयाचा व चौसष्ठयोगिनींनी रक्तजमीनीवर पडू न देता पत्तरवपरडीमध्ये घेऊन वरचेवर प्राशन करावयाचे असे करुन श्रीभैरवनाथांनी सर्वराक्षसांचा नाश केला. युद्ध थांबल्यानंतर शस्त्रधुण्यास पाणी नव्हते. म्हणुन भैरवनाथांनी त्रिशुळ मारून पाणी काढले त्यास लोहतीर्थ(लोहबाई) म्हणून ओळखले जाते. आजही त्या तीर्थात भाविक पापा पासून मुक्ती मिळते या भावनेन स्नान करतात.
श्री भैरवनाथानी राक्षसांचा नाश केला,याचाच आनंदोत्सव म्हणून दरवर्षी श्री क्षेत्र सोनारी येथे नेवारी येथे चैत्र वद्य अष्टमी पासून ते त्रयोदशीपर्यंत मोती यात्रा भरते. सोनारी येथील भैरवनाथाचे मंदिर फार पुरातन व जागृत असुन हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम आहे. मंदिरासमोरच एक माठत तिथ बारा वर्षानंतर काशी येते असी अख्यायिका आहे. त्यातिथ चे पाणी इतर वेळी हिरवे असते पण ज्या वेळी काशीचे आगमन होते. त्यावेळी पाणी काही तासा करीता पांढरे होते. त्यावेळी हजारो भाविक त्यामध्ये येऊन स्नान करतात. मंदिराच्या पाठी मागे काशीबाई तिर्थ असून डाव्या बाजुस नागनिर्झरी तिर्थ आहे. या देवस्थानचा उल्लेख स्कंदपुराणात असुन, भैरव महात्म्य पोथीत यासंबंधी सविस्तर माहिती आहे. सोनारी येथील काळभैरवनाथ हे महाराष्ट्रातील मुळस्थान असून अनेक उपठिकाणे आहेत.
मंदिरातील कार्यक्रमाचे वेळापत्रक
श्री काळभैरवनाथ सोनारी Covid-19 संदेश
श्री काळभैरवनाथ सोनारी
श्री काळभैरवनाथ सोनारी लग्नसोहळा
काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं
सदस्यता घ्या
क्रिएटिव्ह उत्पादने
संदेश पाठवा
[events]
[EM id=4125]


